Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाकरे गटातील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला

ठाकरे गटातील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला
, शुक्रवार, 7 जुलै 2023 (23:44 IST)
सध्या राज्यात राजकीय भूकंप येत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेने ठाकरे गटातील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. 
 
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 2022 साली ठाकरे गटात बंड करून 40 आमदारांना घेऊन दोन गट केले. ठाकरेंच्या गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला.नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, दीपाली सय्यद भोसले, शीतल म्हात्रे या मागे पडल्या आणि अंतर्गत वाद सुरु झाल्यामुळे दीपाली सय्यद, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला. 
 
आता ठाकरे गटातील उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाल्या आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्यांनी कायमच शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली

"1998मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवेसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांनी स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे," असं नीलम गोऱ्हे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
 
केंद्रात NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरी कायद्याविषयी सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची वरील मुद्द्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, असंही गोऱ्हे यांनी म्हटलं.
 
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं त्याच विचारांवर केंद्रातील भाजप सरकार काम करत असल्याचंही त्या म्हणाल्या.
 
 



Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे मॅकडोनाल्ड्स ने बर्गर मधून टोमॅटो वगळले