राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नवीन निर्बंध लादले आहेत. त्याअंतर्गत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नवीन नियम रविवारी रात्री 12 पासून लागू होणार आहेत. शनिवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकाराची 133 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, येथे आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे.
टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभागाशी चारचा करून राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन लावणे हे पर्याय नाही. आपल्याला लॉक डाऊन लावून सगळं ठप्प करायचे नाही. काम बंद करणे हे पर्याय नाही. आपल्याला आरोग्याचे नियमांचं पालन करायचे आहे. लॉक डाऊन लावून जीवन थांबवायचे नाही. काही बंधने पाळायचे आहे. जेणे करून कोरोनाविषाणूंपासून राज्याला मुक्ती मिळेल. असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून राज्यसरकारने ब्रेक द चेन आणि मिशन बिगिन अगेन च्या माध्यमातून वेळोवेळी नियम बनवले आणि त्यांना अमलात आणले. त्या नियमाचं पालन सुजाण लोक करतात. पण काही लोक असे आहेत जे या नियमांचं पालन करत नाही. हे असं अजिबात चालवून घेतले जाणार नाही. हे नियम सर्वांनी पाळले पाहिजे. अन्यथा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. असे निर्देश पोलिसांना आणि सर्व यंत्रणांना दिले आहेत. हे लावण्यात आलेले निर्बंध आपल्या भलेसाठीच आहे. हे सर्वानी लक्षात घ्यावे.
राज्यात 15 फेब्रुवारी पर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरूच असणार. हे बंद आपल्या सुरक्षेसाठी करण्यात आले आहे. ही मिळालेली सुट्टी आपल्याला इकडे तिकडे फिरण्यासाठी दिलेली नाही. आपण इकडे तिकडे फिरून कोरोनाचे प्रसरण होण्याचा भाग बानू नये. असे आवाहन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले आहे.
लसीकरणाचा भाग बना . ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही. त्यांनी लसीकरण घ्या .सतत मास्क लावा. सामजिक अंतर राखा. सेनेटाईझरचा वापर नियमित ठेवा. असे ही मुख्यमंत्र्यांनी संगितले. काही जिल्ह्यात लसीकरण पूर्णपणे झालेले नाही. त्यामुळे अशा भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण देखील वाढू शकतात अशा परिस्थितीत त्या जिल्ह्यात अधिक कठोर निर्बंध करण्याचा पर्याय निवडावा लागू शकतो .
नवीन निर्बंध: रात्री 11 वाजल्यापासून नाईट कर्फ्यू
नवीन नियमांनुसार,
* रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत फक्त लोक अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू शकतील.
* 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील,
*
स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलूनही पूर्णपणे बंद राहतील.
*
* मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये आणि किल्ले देखील पूर्णपणे बंद राहतील.
* 50 लोक लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील,
*
केवळ 20 लोक अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू शकतील.
* खाजगी कार्यालये, हेअर कटिंग सेंटर, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने उघडतील आणि ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल.
* हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद राहतील.
* मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स, ब्युटी सलून, मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये, किल्ले हे पूर्णपणे बंद असतील .
* मॉल्स, थिएटर्स, सिनेमा हॉल, हेअर कटिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स, खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालतील .
सर्व नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणा आणि पोलिसांना दिले आहेत.