Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

खास नवी गाडी : कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी

new-train-on-konkan-railway-route-manmad-to-sawantwadi
, बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:59 IST)

कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.  

०११९८ मनमाड - सावंतवाडी रोड अशी नवी गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी मनमाडवरुन ११ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्याकाळी १६ : १५ वाजता सुटेल ही गाडी सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल.

या गाडीला नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा देण्यात आलाय. १२ स्लीपर कोच, एसेलआरचे दोन कोच असे एकूण १४ कोच असेल. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहार ५८ % वाढले : गडकरी