Publish Date: Wed, 02 Mar 2022 (07:33 IST)
Updated Date: Thu, 29 Sep 2022 (18:21 IST)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येत्या चार ते पाच दिवसांत अंतिम मुलाखती होऊन नवे कुलगुरू मिळतील, अशी माहिती राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यवस्थापन परिषदेला दिली.
राज्यपाल कोश्यारी सोमवारी विद्यापीठात जलतरण तलावाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी संवाद साधला. दीपक पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड, प्रा.एस.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी. फालक, प्रा. मोहन पावरा, डॉ. महेश घुगरी उपस्थित होते.