Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल

new year celebration

दरवर्षीप्रमाणे नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी 31 डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरून 4 अशा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व  मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व  मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. 31 डिसेंबरच्या रात्री बाहेर सेलिब्रेशन करायला गेलेली लोक सार्वजनिक वाहतुकीच्या कमरतेमुळे कुठेही अडकू नये, यासाठी सुविधा दिली जाणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन वर्षात स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश स्वीकारणार नाही