विवाह झाल्यानंतर नववधू सारसचे सर्व दागदागिने आणि रोकड घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये लग्नानंतर एका शेतकरी तरुणाची फसवणूक केली गेली आहे. नवरी दागदागिने आणि रोकड घेऊन पळून गेली. या प्रकरणी शेतकरी तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीमा भारती, नीलेश शंकर भारती आणि शिवांजली देशमुख यांच्या विरुद्ध फसवणूक, अपहार आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार गणेश महाडिक हे शेतकरी असून त्यांची सीमा आणि निलेशसोबत एका लग्नात ओळख झाली तेव्हा त्यांनी विवाहासाठी मुलगी पाहून देतो असे सांगितले होते. नंतर त्यांनी शिवांजलीसोबत विवाह लावून दिला आणि नवऱ्या मुलाकडून 2 लाख 32 हजार रुपये घेतले. मात्र काही दिवसानंतरच गणेश महाडिकला शिवांजलीला सोडचिठ्ठी दे नाही तर बरे वाईट करु असा दम भरला. तर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सोडचिट्टी घेत नवरी मुलगी शिवांजली आणि तिचे साथीदार सीमा आणि निलेश फरार झाले. त्यानंतर गणेश महाडिक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.