Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

नितीन गडकरी यांनी केली अहमदनगर मधून जाणाऱ्या ‘त्या’ हायवेची घोषणा !

Nitin Gadkari announces 'that' highway passing through Ahmednagar!
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (15:35 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला.
 
दरम्यान यावेळी नितीन गडकरी यांनी ‘सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-चेन्नई’ या ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवेची घोषणा केली आहे.या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. त्याचबरोबर या हायवेमुळे नगर मुख्य प्रवाहात येईल, असे गडकरी यांनी म्हंटले आहे.
गडकरी यांच्या भाषणातील महत्वाच्या घोषणा
– औरंगाबाद-अहमदनगर आणि तळेगाव-चाकणही उड्डाणपुलाने जोडण्याची घोषणा कोपरगाव-सावळी विहिरी, तळेगाव-चाकण-श्रीगोंदा-पाटोदा,
जामखेड-सौताडा या नवीन मार्गांचीही गडकरी यांनी घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, अंकूश काकडे,राजश्री घुले, आ.निलेश लंके, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, राम शिंदे, आ.लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र क्षीरसागर, एस पी मनोज पाटील उपस्थित होते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा मोटर्सचा ‘तो’मेसेज शेअर करणे पडेल महागात