Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार

सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (09:40 IST)
सीबीआयला यापुढे महाराष्ट्रातील तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृहविभागाने नुकताच याबाबत मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे यापुढे सीबीआय राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कोणताही तपास आपल्या हाती घेऊ शकत नाहीत हे स्पष्ट झालंय. 
 
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयने स्वत:कडे घेतला. यामध्ये मुंबई पोलिसांची खूप बदनामी झाली. तसेच टीआरपी घोटाळ्याची चौकशी सीबीआय स्वत:कडं घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय. 
 
टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलीस करतायत यासंदर्भात यूपीमध्ये तक्रार दाखल झालीय. यासंदर्भात यूपी पोलिसांनी केलेली चौकशीची विनंती सीबीआयने तात्काळ मान्य केली. आणि सीबीआयने तपास आपल्याकडे घेतला. त्याच पद्धतीने मुंबईतील टीआरपी घोटाळ्याची चौकशी सीबीआय स्वत:कडे घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यापुढे मुंबई पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार