हवामान खात्याच्या IMD अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप जास्त पाऊस तर नाहीच पण अपेक्षित पाऊस देखील कोसळला नाही. ऑगस्ट महिना संपत आला तरीही राज्यातील अनेक जिल्हे अद्याप पावसाची वाट पाहत आहेत. मागील तीन दिवसामध्ये विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली पण पुन्हा राज्यात पावसाने ब्रेक घेतला आहे.
हवामान खात्याकडून, पुढील पाच दिवस राज्यात पावसाची पूर्णपणे उघडीप राहणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राज्याला चांगल्या पावसासाठी Rain आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, मागील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला गेला होता. त्यानंतर राज्यात पावसाची वापसी होण्याची आशा होती. मात्र पावसाने पुन्हा लपंडाव खेळ खेळाला. पुढील पाच दिवस राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही तर काही ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाच्या सरी येऊ शकतात.