Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यावर्षी पुण्यात पाणी कपात नाही

यावर्षी पुण्यात पाणी कपात नाही
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यावर्षी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या ४ धरणात मिळून १०.५५ टीएमसी म्हणजे ३६.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीकपात होणार नाही. मात्र उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणं गरजेचं आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे आणि जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही तर मात्र पाण्याचं नियोजन बदलावं लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'जियो'शी निगडित मोठी बातमी, आता नाही मिळणार हा फायदा