राज्य सरकार कडून खरीप हंगामासाठी 1 रुपयांत विमा योजना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे. आता 1 रुपयांत रब्बी हंगामात ही विमा योजना सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुविधा सुरु केली. ही माहिती राज्य कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसाद मिळाला आहे. या मुळे आता राज्य सरकार रब्बी हंगामात फक्त 1 रुपयांत विमा योजना देणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सुमारे 7 लाख 45 हजार 316 शेतकऱ्यांनी 5 लाख 34 हजार 947 हेक्टर वरील पिकांचा विमा काढला होता. 2 हजार 32 कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली. ही रब्बी पीक विमा योजना धुळे, पुणे हिंगोली, धाराशिव आणि अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इंश्युरंस कं.लि. मार्फत राबविण्यात येणार आहे.
यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार आहे. येत्या आठवडाभरात जिल्ह्यात 53 हजार 951शेतकऱ्यांच्या खात्यावर 378 कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.