Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबीसी, मराठा आरक्षणाच्या ठराव संदर्भात सरकारची चालबाजी - दरेकर

ओबीसी, मराठा आरक्षणाच्या ठराव संदर्भात सरकारची चालबाजी - दरेकर
, बुधवार, 7 जुलै 2021 (11:30 IST)
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणापासून एमपीएससीपर्यंतच्या विषयावर ठाकरे सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले.पण ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या ठराव संदर्भात सरकारची चालबाजी असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केले.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, सरकारने दाखवून दिलं की, वरच्या सभागृहात निलंबन करून आकडे कमी होत नाही, सत्तेवर त्याच्या विपरित परिणाम होत नाही म्हणूनच केवळ निलंबन झालं नसावं.दरम्यान या दोन दिवसांच्या अधिवेशनात विरोधकांना नेमकंच दोन-तीन विषयांवर बोलता आलं. पूर्णपणे वरच्या सभागृहात मुस्कटदाबी करून जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडण्यापासून वंचित ठेवलं गेलं. तथापि जो,जो वेळ मिळाला त्यामध्ये महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आपण प्रश्न मांडला.ज्या बेकारीमुळे नियुक्ती झाली नव्हती, त्यामुळे स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. त्या अनुषंगाने संवेदना सभागृहात मांडल्या आणि परीक्षा लवकर घ्याव्यात, नियुक्त लवकर कराव्यात अशा प्रकारची मागणी सभागृहात केली.त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या विषयावर सभागृहात बि-बियाणं असतील, खतं असतील, पीक कर्ज असेल, कर्ज माफी असेल या सगळ्या विषयांसदर्भात भाष्य केलं असे दरेकर म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबई विमानतळाला शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी