Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, खोकल्याचे औषध समजून विषारी औषध घेतले, पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

बाप्परे, खोकल्याचे औषध समजून विषारी औषध घेतले, पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू
, बुधवार, 31 मार्च 2021 (08:10 IST)
बारामती तालुका पोलीस ठाण्यातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्यामुळे या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट दराडे (वय 45) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
 
दराडे हे बारामती तालुका पोलिस दलात कार्यरत होते. इंदापूर तालुक्यातील अकोले येथे ते राहत होते. मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांना खोकला येत होता. नेहमीप्रमाणे ते आपली ड्युटी बजावून घरी आराम करत होते. रात्रीच्या सुमारास त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक विषारी औषध प्राशन केले. यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. घरच्यांना त्यांनी मी हे औषध प्यायले असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल