Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उद्या एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार

Sharad Pawar will be admitted to Breach Candy Hospital
, मंगळवार, 30 मार्च 2021 (22:21 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या म्हणजेच बुधवारी एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार आहे . पण त्यांना आजच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पोटात पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना आजच रुग्णालयात दाखल करावं लागलं असल्याचं या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 
याआधी सोमवारी देखील शरद पवारांना अशाच पद्धतीने पोटात दुखू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी बुधवारी त्यांची सर्जरी नियोजित करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारीच शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र, पुन्हा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये दिली आहे.
“हा बॉल स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी एंडोस्कोपी उद्या केली जाईल. त्यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर मायदेव त्यांच्यावर एंडोस्कोपी करतील. पोटात दुखतंय म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही.  दुपारी ३ च्या सुमारास एंडोस्कोपी केली जाणार आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता धक्कादायक ! नागपूरच्या रुग्णालयात एका बेडवर कोरोनाचे दोन रुग्ण !