Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन अदा होणार

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन अदा होणार
, गुरूवार, 25 मार्च 2021 (13:04 IST)
मुंबई- राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे 28 हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
 
श्री देशमुख यांनी पुढे सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल. कोविड च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
 
राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात 
 
आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250 ) मानधन दरमहा अदा करण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत 24 तासांत 5,000 नवीन रुग्णांची भर, उच्चांक गाठला,432 इमारती सीलबंद