राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्चपर्यंत पडेल आणि राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार असल्याचं भाकित नारायण राणे यांनी व्यक्त केलं होतं. मात्र भाजपच्याच गिरीश महाजन यांनी राणेंच्या वक्तव्याचपेक्षा वेगळं वक्तव्य केलं आहे.
राज्यातील सरकार पडेल तेव्हा पडेल मात्र आम्ही विरोधी पक्षाची भूमिका योग्य प्रकारे बजावण्याचा निर्णय घेतला आहे, असं महाजन यांनी म्हटलं आहे
नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही, असं महाजन म्हणाले. त्याचवेळी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा एकदा दगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर आम्हाला जातीयवादी ठरवणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.