Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

जिंदाल कंपनीतील स्फोटात आणखी एकाचा मृत्यू

death
, शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (07:47 IST)
जिंदाल कंपनीतील स्फोटात आणखी एकाचा मृत्यू, सुधीर मिश्रा असे मयताचे नाव असून  ते प्रयाग राज यूपी येथील असल्याची माहिती मयातचे बंधू कमलाकर मिश्रा यांनी दिली आहे, मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवारी (दि.१) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या २० रुग्णांना नाशिक मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून  दोन महिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला होता.
 
त्यानंतर घटनास्थळी तीन दिवसापासून मलबा हटविण्याचे काम सुरू असताना बुधवारी (दि.४)सकाळी १० वाजता सुधीर मिश्रा या कामगाराचा मृत्यू आढळून आल्याने मलब्यात आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशाची राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले