राज्यातील मंदिरं दहा दिवसांत खुली केली नाही तर जेलभरो आंदोलन करा, असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं आहे.
राज्यात दारुची दुकानं, हॉटेल्स सर्व काही सुरू करण्यात आलं आहे. तिथेही गर्दी होत आहे.तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मंदिर कृती बचाव समितीने यासाठी आंदोलन उभं करावं असंही आवाहन त्यांनी केलं.राज्य सरकारचं धोरण बरोबर नाही असं म्हणत या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
भरकटत असलेल्या समाजाला मंदिर तारु शकतात यावर माझा विश्वास असून मी आज जे काही आहे ते मंदिर संस्कृतीमुळे असंही अण्णा हजारे म्हणाले.