Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे आदेश

eknath shinde
शिंदे-फडणवीस सरकारने  नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. 
 
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये 55 हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून, त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच, राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली