Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन

jitendra awhad
, शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (21:05 IST)
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
आजवरच्या 23 वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेमध्ये राहिला. शरद पवार यांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रांतील विचारवंत, अभ्यासक, कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकार आदी मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले.
Published by : Ratandeep

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बच्चू कडू यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल