Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली

mobile
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (14:57 IST)
सांगली: मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य बनला. पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.
 
सोमवारी मानसिक आरोग्य दिनी मोहिमेची सुरुवात झाली असून आता   माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाईलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. यातून मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची निश्चित संख्या व व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.
 
मोबाईलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाईल. शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, जनजागृती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातील. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चाैगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, माधुरी गुरव, पोपट मलगुंडे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, मानसतज्ज्ञ क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील, सूरज कदम, प्रियांका सरतापे, वसुंधरा पाटील, कालिदास पाटील यांचा सहभाग असेल.
 
याच्या होतील नोंदी -
- मुलांचा मोबाईलमध्ये जाणारा वेळ
- पाहिली जाणारी संकेतस्थळे
- अभ्यासाव्यतिरिक्त होणारा वापर
- कार्टून, मनोरंजन, संशोधन व आक्षेपार्ह माहितीसाठी वापर
- मोबाईल वापरात पालकांचा होणारा हस्तक्षेप
- मोबाईल बंद केल्यास वागणुकीत होणारे बदल
 
८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा -
कालिदास पाटील यांच्या ‘सुश्रुषा’ संस्थेने जिल्ह्यातील १५ वर्षांपर्यतच्या ८ हजार ८९२ मुला-मुलींचे मोबाईलच्या दृष्टीने मानसशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यातून ८५ टक्के मुलांत चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये टोकाचा संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळली.
 
 
Edited By- Ratandeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली हायब्रीड कार नितीन गडकरी यांनी लाँच केली