पावसाचे धुमशान सुरूच आहे ११ सप्टेंबरपर्यंतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २७७ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक, तर ७२ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद
झाली आहे.
गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ही संततधार साेमवारीही कायम हाेती. नागपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या विदर्भातील सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात ११ तारखेपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७५.६० टक्के पाऊस पडला असला, तरी १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.