Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

पडळकरांनी शरद पवारांच्या दिल्लीच्या बैठकांची उडवली खिल्ली

Padalkar
, बुधवार, 30 जून 2021 (16:16 IST)
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकरांनी शरद पवारांच्या दिल्लीच्या बैठकांची खिल्ली उडवली आहे. मला दिल्लीचं राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे एकत्र आले होते, त्यांनी बैठका घेतल्या. यांची अवस्था ही रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, अशी झाली आहे, अशी जहरी टीका पडळकरांनी शरद पवार यांच्यावर केली. ते सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघात बोलत होते.
 
मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत, त्यांना पुढील ३० वर्षांच्या भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्या बैठकांची खिल्ली उडवली. तसंच, शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं देखील पडळकर म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला : दरेकर