पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर झाले. यावेळी त्यांनी लोकसभेचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, अशी साक्ष दिली आहे.
निंबाळकर यांच्या हत्येविषयी मला मीडियामधून कळाले. मला मारण्यासाठी सुपारी दिली होती, अशीही मला माहिती मिळाली होती. या प्रकरणी मी पारनेर पोलिस स्थानकात (अहमदनगर जिल्हा) तक्रार दिली होती. याबाबत मी सरकारला पत्र देखील लिहिले होते. मात्र, मी केलेल्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही, असेही त्यांनी कोर्टापुढे म्हटले आहे.
पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. अण्णा हजारे यांच्यासह पवनराजे हत्याकांडात जवळपास सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.