पंढरपुरात विठोबा रखुमाईच्या पदस्पर्शाच्या दर्शनाला आजपासून सुरुवात झाली असून आता भाविकांना विठोबाच्या कमलपदस्पर्श करता येणार आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभारा आणि रखुमाईच्या गाभाऱ्याचे संवर्धन काम 15 मार्च पासून सुरु करण्यात आले होते त्यामुळे विठ्ठल रखुमाईच्या मंदिराचे मुखदर्शन होत होते.
आता आजपासून विठ्ठलाच्या पद्स्पर्शाचे दर्शन सुरु झाले असून भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आज विठ्ठल मंदिराची फुलांनी आरास करण्यात आली असून विविध रंगांच्या फुलांनी गाभारा सजवला आहे. या मध्ये 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.विविध रंगाची फुले या साठी वापरली आहे.
आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची महापूजा केली.विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूच लांब रांगा लावल्या होत्या.भाविकांसाठी आज आनंदाचा दिवस असून आता ते आपल्या लाडक्या विठ्ठल रखुमाई चे पदस्पर्श दर्शन घेऊ शकणार.