Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा काय निर्णय घेतील माहित नाही ? मात्र रोहिणी, पंकजा यांना निवडणुकीत पाडले - एकनाथ खडसे

पंकजा काय निर्णय घेतील माहित नाही ? मात्र रोहिणी, पंकजा यांना निवडणुकीत पाडले - एकनाथ खडसे
, मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (16:38 IST)
भाजपचे जेष्ठ नेते आणि ज्यांची उमेदवारी नाकारत भाजपाने त्यांच्या मुलीला दिली मात्र तिचा देखील पराभव झाला, असे एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपवर अर्थात स्वतःच्या पक्षावर टीका केली आहे. त्यांनी पंकाजा मुंढे आणि रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले असा आरोप केला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या करतानाच पक्षाच्या उमेदवारांविरूद्ध कारवाया करून उमेदवारांना पाडण्याचे उद्योग झाले. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनाही अशाच रितीने पाडण्यात आले तर  पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचाही असाच आरोप आहे. हे उद्योग करणाऱ्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पुराव्यासह देणार असून मी  कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
 
एकनाथ खडसे यांनी भाजपा नेत्या  पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी  खडसे म्हणाले की, भाजपा नेत्या माजी मंत्री  पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नाही. तर त्यांना  पक्षांतर्गतच कारस्थान करत पाडले आहे.  त्यांच्या विरोधातील उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत केली गेली. तर  अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्याबाबत तर उघडपणे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात कार्य केले आहे. त्यांची नावे मला स्वत:लाच माहिती आहेत. ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहे.त तरीही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. कारवाईची वाट पाहत आहोत असे खडसे म्हणाले आहे. 
पुढे पंकजा यांच्यावर बोलतांना खडसे म्हणाले की ‘त्या’ अस्वस्थ असल्या तरी काय निर्णय घेणार? याची मला  माहिती नाही. त्यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जेव्हा  गोपीनाथराव मुंडे होते तेव्हा पासून भगवान गडावर मी जात होते. तर  आताही पंकजा यांनी बोलविले तर गोपीनाथ गडावर जाणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कडक कारवाई करा केंद्रांचे राज्यांना आदेश