Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

काँग्रेस जिंकल्यावर 'पप्पू' आता 'परमपूज्य' झाले : राज ठाकरे

pappu become parmpujya
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकल्यावर काँग्रेसची सरकार बनणार. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या दरम्यान आक्रमक प्रचार केला होता. तिन्ही राज्यांमध्ये आघाडी मिळाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले की राहुल गांधी ज्यांना विपक्षी दल 'पप्पू' म्हणून हाक मारतात ते आता 'परम पूज्य' झाले आहेत.
 
त्यांनी प्रश्न केला की काय त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
 
त्यांनी म्हटले की मोदीजी आणि अमित शाह यांच्या मागील चार वर्षाच्या वागणुकीचा हाच परिणाम हाती येणार होता. ते सर्व मोर्च्यांवर अपयशी ठरले आणि त्यांच्याकडे जनतेला दर्शवण्यासारखे काहीच उरले नाही. ते राम मंदिर कार्ड खेळत होते परंतू जनता समजूतदार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख : अश्लील व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देऊन बलात्कार