Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महापुरानंतर मुंबई मनपाची विराट कारवाई उचलला साडेतीन हजार टन कचरा

महापुरानंतर मुंबई मनपाची विराट कारवाई उचलला साडेतीन हजार टन कचरा
, सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (10:10 IST)
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सांगली येथे आलेल्या पुरानंतर मोठी मदत केली आहे. सांगली येथील आलेला महापूर ओसरल्यानंतर सांगलीच्या स्वच्छतेत मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. फक्त आठवडाभर ४५० कर्मचाऱ्यांचे पथक अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्वच्छतेच्या कामात सहभागी होत त्यांनी कामाला झोकून दिले. मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले आहे. सांगली शहर स्वच्छ झाले आहे. 
 
महापुरानंतर खºयाअर्थाने स्वच्छतेचे मोठे आव्हान सांगली महापालिकेसमोर होते. अशा संकटसमयी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राज्यातील नगरपालिका सांगलीच्या मदतीला धावून गेले, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सफाई कामगार व अधिकाºयांचे पथक सांगलीला पाठविले होते. या पथकाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुनील सरदार व स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई महापालिकेचे ४०० कर्मचारी व ५० वाहनचालक, १२ डंपर, ७ सक्शन व जेटिंग व्हॅन, २ जेसीबी, ३ स्मॉल अर्थमुव्हर यंत्रे असा सर्व ताफा मुंबईतून १२ आॅगस्ट रोजी रात्रीतच सांगलीमध्ये दाखल झाला.१५ आॅगस्ट रोजी साधारणत: ७० टक्के परिसर स्वच्छ झाला होता. १६ रोजी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिक घरी, दुकानांकडे परतू लागले. परिणामी घरातील व दुकानातील साहित्य, फर्निचर, कपडे, पुस्तके, सडलेले खाद्यपदार्थ आदीमुळे शहरामध्ये कच-याचे ढीग व दुर्गंधी पसरली होती. ही परिस्थिती पाहून मुंबईच्या पथकाचा मुक्काम आणखी दोन ते तीन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला.
 
दि. १७ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील बाजारपेठा, रहिवासी विभाग व बफरझोनमध्ये स्वच्छता केली. या पथकाने जवळपास साडेतीन हजार टन कचरा उचलून तो डेपोवर पोहोचविला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चारदिवसीय किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास होणार सुरुवात