महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे त्याचे कारण असे की काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधानभवनात राहुल नार्वेकरांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दाराआड चर्चा झाली आहे. भेटीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजप मध्ये येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र याला अद्याप अशोक चव्हाण यांच्याकडून कोणताही दुजोरा नाही. आज अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकरांशी दाराआड भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी आमदारकी पदावरून राजीनामा दिल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून सध्या त्यांचे फोन नॉट रिचेबल आहे.
अशोक चव्हाण यांच्या सोबत 11 आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतल्यावर या गोष्टी समोर आल्या.
काही दिवसांपूर्वी काँग्रेचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. आता बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आता अशोक चव्हाण आणि राहुल नार्वेकरांनी भेट कोणता राजकीय भूकंप आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.