शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी संपली. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रकरणात एकूण पाच याचिका आहेत. त्या याचिका दोन गटात विभाजित केल्या जाणार आहेत. दरम्यान 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्यात येणार. दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारी पासून बोलावण्यात येणार आहे.
25 जानेवारी पर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकुन घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने प्रतिज्ञापत्रात सुमारे ४० आमदार-खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. पक्षाचे अधिक आमदार आमच्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी पक्षावर आपला दावा ठोकला आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor