Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत 1 हजार कोटी घेतले - शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा आरोप

प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत 1 हजार कोटी घेतले - शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा आरोप
, रविवार, 27 मार्च 2022 (10:26 IST)
वेगवेगळ्या कारणांनी राज्याचं राजकारण तापलं असताना आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केलेत,

आंबेडकरांनी निवडणुकीत 1 हजार कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं आहे. हिंगोलीत शिवसंपर्क अभियानादरम्यान, जवळा बाजार येथील आयोजित मेळाव्यात आमदार संतोष बांगर बोलत होते. यावेळी ते म्हणाले,"एमआयएम ही भाजपची बी टीम असून भाजपने त्यांना मत विभाजित करण्यासाठी पुढे केलं आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचाही याचसाठी वापर करण्यात आला.
 
"आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी, बौद्ध समाजाची मतं मिळवण्यासाठी हा प्रकार घडला. आंबेडकर यांना मागच्यावेळी 1 हजार कोटी रुपये देण्यात आले. प्रचारासाठी मागच्या निवडणुकीत आंबेडकरांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. हे हेलिकॉप्टर कुठल्या पैश्यातून आले, हे त्यांनी लोकांना सांगावं".
 
दरम्यान संतोष बांगर यांच्या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटायला सुरुवात झाली आहे. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांचा पुतळा जाळत त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. दुसरीकडे परभणीतही वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'कश्मीर फाइल्स सर्वांनी पाहावा म्हणजे कळेल काँग्रेसच्या काळात काय झाले' - शाह