आधीच लांबलेला मान्सून आलेल्या चक्रीवादळामुळे आता पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
तसेच, जूनच्या तिसर्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता . येत्या काळ्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत जून महिन्यात एकदा पावसाचा खंड झाला की संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम होतो. मान्सून लांबल्याने शेतकर्याच्या नजरा मान्सूनच्या काळ्या ढगांगडे लागल्या आहेत.