Prataprao Borade passed away :ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. आज सकाळी त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या वर आज संध्याकाळी अंत्य संस्कार करण्यात येतील. प्रतापराव बोराडे यांनी मराठवाड्याच्या शेक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.या शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
त्यांना 2020 मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये दुहेरी पदवी घेतली होती.
त्यांनी तब्बल दोन दशकहुन जास्त काळ जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांचा राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान होत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आंणि शैक्षणिक क्षेत्रात कमतरता भासत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे.