Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री, दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे राष्ट्रवादीत

अभिनेत्री, दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे राष्ट्रवादीत
, शनिवार, 4 जुलै 2020 (19:47 IST)
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, एका वृत्तपत्राशी संवाद साधताना प्रिया बेर्डे यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार आहे. प्रिया बेर्डे  सध्या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली