Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pro Govinda League 2023 : गोविंदा खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी; मुख्यमंत्रीचे वक्तव्य!

eknath shinde
, शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (08:43 IST)
Pro Govinda League 2023 : दही हंडी आता या खेळाला साहसी खेळ असा दर्जा मिळाला आहे. आता दही हंडी खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. या खेळातील खेळाडूंना देखील इतर खेळांच्या खेळाडू प्रमाणे खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार, शासकीय सेवेत घेण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथे एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग 2023 च्या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात बोलताना सांगितले. या कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री  संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, अभिनेता अभिषेक बच्चन उपस्थित होते.
 
 या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा राज्यशासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली असून अजून देखील अनेक गोविंदांना यासाठी नोंदणी करता आली नाही.आता पर्यंत 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. दही हंडी उत्सव स्व. आनंद दिघे यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची सुरुवात केली आणि थरांचे विक्रम ठाण्यातील गोविंदानी केले. या स्पर्धेची संकल्पना प्रताप सरनाईकांच्या संकल्पनेतून आली आहे. 
 
या वेळी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणालें  देशात प्रथमच गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असेही ते म्हणाले. 
क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जवान : शाहरूख म्हणतोय, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’