Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांना पोलिसांकडून समज

पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांना पोलिसांकडून समज
ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे या दोघांना डेक्कन पोलिसांनी समज दिली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही, असे स्पष्ट करत कार्यक्रम घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डेक्कन पोलिसांनी दिला आहे.

गेल्या 3 जानेवारी रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवून नदीत फेकला होता. त्यानंतर 31 जानेवारी रोजी संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी संभाजी उद्यानात एकत्र येण्याचे आवाहन पुष्कर श्रोत्री आणि शरद पोक्षेंनी केले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कॅग विनोद राय