Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 7 March 2025
webdunia

पुण्याचे लोहगाव विमानतळ या नावाने ओळखले जाईल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव

पुण्याचे लोहगाव विमानतळ या नावाने ओळखले जाईल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव
, शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (16:04 IST)
पुण्यातील विमानतळाच्या नवीन नामकरणाचा प्रस्ताव नुकताच विधानसभेत मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली असून आता विधानसभेतूनही त्याला हिरवा झेंडा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारांनंतर 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली या काळात राज्याच्या विकासाच्या प्रश्नांबाबत सरकारकडून अनेक प्रकारचे प्रस्ताव विधानसभेत ठेवण्यात आले आहेत.
 
यावेळी महाराष्ट्र विधानसभेत पुलाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेने 19 डिसेंबर रोजी पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नामकरण “जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ” करण्याचा ठराव मंजूर केला.
नाव बदलण्याचा हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आणि विमानतळाच्या नामांतरासाठी पाठवण्यात येणार आहे. नाव बदलण्याचा हा प्रस्ताव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 110 अन्वये मांडला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला. पुणे विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्तावही महाराष्ट्र मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजूर केला आहे.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंदिर-मशीद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य