Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 7 March 2025
webdunia

मंदिर-मशीद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

mohan bhagwat
, शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (15:28 IST)
सध्या देशात मंदिर- मशीद वादाने जोर पकडला असून अनेक वाद समोर आले आहे.या वादांवर जोरदार चर्चा सुरु आहे. काही प्रकाराने न्यायालयात पोहोचली आहे. मंदिर -मस्जिद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य दिले आहे. ते म्हणाले, अयोध्यातील राममंदिरच्या उभारणीनंतर काहींना असे वाटते की असे मुद्दे उपस्थित केल्याने ते हिंदूंचे नेते होतील. नवीन वाद मान्य नसल्याचे ते म्हणाले. ते पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भारत-विश्वगुरू या वर ते बोलत होते. 

त्यांनी मंदिर- -मशीद वादावर चिंता व्यक्त केली. देश एकोप्याने जगू शकतो हे जगाला दाखवून द्यायचे आहे.असे ते म्हणाले. 
 राम मंदिराची उभारणी केली आहे ते हिंदूंच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. दररोज तिरस्कारांचे आणि वैर उत्पन्न करण्याचे नवनवीन मुद्दे उपस्थित करणे योग्य नाही. या वर अखेर उपाय काय? आपण जगाला दाखवून द्यावे की आपण एकोप्याने जगू शकतो. आपल्या देशात विविध पंथ आणि समुदायांच्या विचारधाराची अनेक लोक आहे. 

भागवत पुढे म्हणाले की, बाहेरून आलेल्या काही गटांनी आपल्यासोबत धर्मांधता आणली आणि त्यांची जुनी राजवट परत यावी अशी त्यांची इच्छा आहे. देश आता संविधानानुसार चालतो. या व्यवस्थेत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि ते सरकार चालवतात. वर्चस्वाचे दिवस गेले.तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर मग वर्चस्वाची भाषा का वापरता? अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्यांक कोण इथे सर्व समान आहे. फक्त सद्भावनेने जगणे आणि नियमव कायद्याचे पालन करणे सर्वांनी आवश्यक आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला,पोलिसांनी लाठीचार्ज केला