Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

पुणेकरांनो, १० रुपयात दिवसभर प्रवास करा

पुणेकरांनो, १० रुपयात दिवसभर प्रवास करा
, शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (16:21 IST)
पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणली आहे. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार आहे. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रदुषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांचा अतिवापर यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात प्रवासासाठी महापालिकेने ही खास योजना आणली आहे. 
 
पुणेकर प्रवाशांकडून या योजनेच स्वागत होतं आहे. मात्र तिच्या अंमलबजावणी विषयी त्यांच्या मनात शंका आहे. डेक्कन ते पुलगेट, स्वारगेट ते शिवाजीनगर, स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन मार्गे पुलगेट या मार्गावर ही सेवा सुरु होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारियाने भारतीयांवरील प्रेमापोटी काढला होता 'तो' टॅटू