Publish Date: Tue, 06 Aug 2019 (09:13 IST)
Updated Date: Tue, 06 Aug 2019 (09:14 IST)
राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे (emergency gate) उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट झाला. यामुळे वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब वीज निर्मिती होते. उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे येथून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत. महापारेषणकडून महावितरणच्या राधानगरी, सोळांकूर व कसबा तारळे ३३/११ केव्ही उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठा खंडित केला आहे. दुसऱ्या मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन दरवाजातून होणारा विसर्ग कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला विनंती करण्यात आली आहे.