सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ - चंद्रकांत पाटील

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (08:52 IST)
कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.  
 
सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ राज्यातील 92 टक्के कर्जदार शेतकऱ्यांना झाला. मात्र खावटी कर्ज घेणारे, संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणारे किंवा भूविकास बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी आणि सध्याच्या कर्जमाफी निकषात न बसणारे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा न झाल्याने त्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीदार अशी नोंद होते.
 
यातून मार्ग काढण्यासाठीच संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांचे 600 ते 700 कोटींचे कर्ज लवकरच माफ करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे