Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

पुन्हा एकदा कुंचल्यातून राज याच्याकडून मोदींवर निशाणा

Maharashtra news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निशाणा केला आहे. फेसबुकवरील ऑफिशियल पेजवरुन राज ठाकरेंनी मोदींवर टीका करणारं व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.
 
7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता."
 
मोदींच्या या वक्तव्याला उत्तर म्हणून राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे असून मोदींवर निशाणा साधला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१७ वर्षांत प्रथमच स्टेट बँकेला तोटा