Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाईत : राज ठाकरे

raj thakare
, गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (15:33 IST)

माथी भडकवून जातीपातीचं राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे.  खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाईत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते साताऱ्या बोलत होते.  नरेंद्र मोदी म्हणजे नमो रुग्ण. केंद्र आणि राज्यात फसवणूक सुरु आहे आहे. नरेंद्र मोदी यांचे हे शेवटचं बजेट आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस दररोज आकडेमोड करत आहेत. 

मुख्यमंत्री आहेत की रतन खत्रीचा मटका चालणारे एजंट, अशी टीका केली. देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणाऱ्या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव अटळ आहे, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय स्वस्त, काय महाग...