Publish Date: Mon, 25 Dec 2023 (09:05 IST)
Updated Date: Mon, 25 Dec 2023 (09:07 IST)
राज्यपाल रमेश बैस यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.