भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर शाळेची इमारत बळकावल्याचा आरोप होत आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील जोमाळा गावात मॉडेल स्कूलची इमारत दानवेंच्या संस्थेला देण्यात आली आहे. अगदी नाममात्र भाडेतत्वावर ही इमारत रावसाहेब दानवेंना मिळाल्याचा आरोप होत आहे.
जयराम रमेश ग्रामविकास मंत्री असताना देशात 100 मॉडेल स्कूल करण्याचं ठरलं होतं. मनमोहन सरकार जाऊन मोदी सरकार आल्यावर मॉडेल स्कूलचा प्रस्ताव मागे पडला. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती राज्य सरकारने पूर्ण केल्या. त्यापैकी जवळपास चार हजार स्क्वेअर फुटांची जागा आणि 25 खोल्या असलेली जोमाळ्यातील शाळेची इमारत रावसाहेब दानवेंच्या संस्थेला भाड्याने मिळाली. रावसाहेब दानवे मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव. दानवेंना संस्थेचा इमारतीचा ताबा मिळताच मराठवाडा रेसिडेंशीअल स्कूल भोकरदन या नावाने इंग्राजी माध्यमाची शाळा सुरु केली. सध्या शाळेत 315 मुलं शिकत आहेत.