एका प्रसिद्ध एअरलाईन्सच्या 25 वर्षाच्या एयर होस्टेससोबत सोमवारी मुंबईच्या एका फ्लॅटमध्ये सामूहिक दुष्कर्माचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका सह कर्मचार्याला अटक केली आहे. ज्याला कोर्टाने 10 जून पर्यंत पोलिसांना ताब्यात दिले आहे. महिलेच्या तक्रारीवरून ज्या फ्लॅटमध्ये तिच्यासोबत सामूहिक दुष्कर्म करण्यात आलं त्यात तीन लोक राहतात आणि घटनेवेळी तिथे एक महिला देखील उपस्थित होती.
23 वर्षीय आरोपीचं नाव स्वप्नील बदोनिया असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो एअरलाईन्स सुरक्षा विभागात कार्यरत आहे. इतर दोन व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
पोलिसांप्रमाणे घटना सोमवारी घडली जेव्हा पीडिता हैदराबादहून मुंबई पोहचली. ती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी सात वाजता पोहचली. नंतर तिला आरोपी भेटला. दोघे एकाच कारने विमानतळाहून बाहेर पडले आणि तिने त्याला मलाड येथील एका मॉलजवळ सोडून पुढे निघाली. तिने घरी जाऊन आपलं सामान ठेवलं आणि पुन्हा मॉलपाशी आली जिथे आरोपी तिची वाट बघत होता. नंतर दोघे बारमध्ये गेले. दोघांनी बार बंद होईपर्यंत दारूचे सेवन केले.
स्वप्नील बदोनियाप्रमाणे पीडितेने एवढी दारू प्यायली की तिला घरा पाठवण्याऐवजी हॉटेलमध्ये चेक-इन करणे असे ठरवले पण तिची अवस्था बघून चेक-इन करण्याची परवानगी मिळाली नाही. नंतर आरोपीने तिला फ्लॅटवर थांबण्याचा सल्ला दिला जिथे तो इतर दोन रुममेट्ससोबत राहतो.
पीडितेने सांगितले की 'तो मला आपल्या अंधेरी (पूर्व) स्थित फ्लॅटवर घेऊन गेला जिथे त्याचे दोन रुममेट आणि एक महिला उपस्थित होती. माझ्या अवस्थेचा फायदा घेत त्यांनी माझ्यासोबत दुष्कर्म केलं आणि मारहाण देखील केली.' सूत्रांप्रमाणे सकाळी दहा वाजत उठल्यावर तिच्या डोळ्या आणि खांद्यावर जखमा दिसल्या.
जेव्हा पीडितेने स्वपनिलला विचारले तर त्याने नशेत असल्यामुळे काहीच आठवत नाही असे म्हटले. दुसर्या महिलेला विचारल्यास तिने उत्तर देण्यास नकार दिला. अधिकार्यांप्रमाणे रात्रभर तिचे वडील तिला फोन करत होते पण तिने फोन रिसीव्ह केला नाही. मात्र एका मित्राने तिला जोगेश्वरीजवळ मॅकडोनाल्ड्समध्ये स्वप्नील बदोनियासोबत बघितले होते.'
पीडितेचा मित्र तिला घरी घेऊन गेला आणि जेव्हा वडिलांनी जखम झाल्याचे कारण विचारले तर आरोपीने तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचे सांगितले. वडील तिला हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा पोलिसात सूचना करण्यात आली.