Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rapper Mungase : रॅपर राज मुंगासेचा खुलासा

Rapper Mungase : रॅपर राज मुंगासेचा खुलासा
, बुधवार, 12 एप्रिल 2023 (18:56 IST)
काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर राज मुंगासे यांचं रॅप गाणं प्रचंड व्हायरल झालं.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास  दानवे यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंवर शेअर केला  आहे.  याप्रकरणी अंबरनाथमधील एका महिलेच्या तक्रारीवरून रॅपर राज मुंगासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणा नंतर रॅपर राज मुंगासे हा बेपत्ता झाला होता. त्याने पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याने अनेक खुलासे केले आहे.  
 
राज मुंगासे म्हणाला की, माझ्यावर रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, असा दबाब टाकला जात होता.मला मुळात अटक झालीच नाही. पण संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता. त्यानंतर ते लोक माझ्या घरीही गेले होते. मी या व्हिडीओ मध्ये काहीच चुकीचं बोललो नाही. तसेच मी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही.तुम्ही 50 खोके घेतलेच नसतील तर तुम्ही हे स्वतः वरून का घेता. का मी व्हिडीओ डिलीट करू ,मी गाण्यात कुणाचं ही नाव घेतले नाही. 

जेव्हा एफआयआर दाखल झाली, तेव्हा मी त्या एफआयआरचा व्हिडीओ अंबादास दानवे साहेबांना शेअर केल्यावर त्यांनीं दानवे साहेबांच्या वकिलाला नंबर दिला. मी अंडरग्राउंड झालो. मी कुठे आणि कसा  आहे ह्याचे कोणालाच माहित नव्हते .तसेच पोलीस ताब्यात घेतील. यामुळे मला अटकपुर्व जामिनासाठी अर्ज करायचा होता, पण त्या कालावधीत तीन दिवस सुट्टी होती, म्हणून मला लपून राहवं लागलं,असे राज मुंगासे यांनी सांगितले 
 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण