Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rashmi Shukla :आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

rashmi shukla
, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (23:40 IST)
Rashmi Shukla :महाराष्ट्र फोन टेपिंग प्रकरणात क्लीनचिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. सध्या त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. त्यांची नियुक्ती महासंचालक पदी रजनीश शेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे करण्यात आली आहे. 

मंगळवारी राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या. येत्या डिसेंबर 2023 मध्ये रजनीश शेठ हे सेवानिवृत्त होणार असून त्यांनी त्यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. या बॅच 1988 च्या आयपीएस अधिकारी आहे. 
 
रश्मी शुक्ला 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदी होत्या. त्यांच्यावर विरोधीपक्षाच्या नेत्यांचे फोन टेप करण्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात त्यांच्यावर दोन गुन्हा मुंबईच्या कुलाबा आणि पुण्यात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई माविआ च्या काळात झाली. नंतर राज्य सरकार मध्ये बदल झाले आणि शिंदे सरकार आल्यावर या फोन टेपिंग प्रकरणात पोलिसांनी 'सी समरी अहवाल न्यायालयात सादर केला. 
 
मुंबईच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्य सरकारने नकार दिल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल केलेले एफआयआर रद्द केले आणि रश्मी शुक्ला यांना फोन टेपिंग प्रकरणातून क्लीनचिट मिळाली.

रजनीश सेठ यांची एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रजनीश सेठ यांच्याकडे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 






Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजारपणासाठी जेलबाहेर, ससूनमधून ड्रग्जचं रॅकेट आणि 2 कोटींचं ड्रग्ज घेऊन हॉस्पिटलमधून पसार