Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु आहे. अनेक ठिकाणी परतीचा पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आले आहे. येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मुंबईत अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे समुद्राची पातळी वाढणार असून महाराष्ट्र आणि गोव्यातील समुद्री किनाऱ्यावरील मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
कोल्हापूर आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्यासह या ठिकाणी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, नागपूरसह विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 2 दिवसात कोकण आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान माघारी फिरण्याची शक्यता वर्तवली आहे.