Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लक्झरी बसला आग

accident
, रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (12:26 IST)
Samruddhi Highway Accident :समृद्धी महामार्गावर अपघात होण्याचे कमीच होत नाही. आता समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लग्झरी बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या खाजगी बस मध्ये एकूण 30 प्रवासींसह दोन चालक होते. 
 
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकर जवळ चेनेज 280 वर हा अपघात झाला.  
अमरावतीहून पुणे जाणारी सिद्धी ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसने पेट घेतला. एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
 
समृद्धी महामार्ग आणि अपघात आता हे समीकरण ठरलंच आहे. धावत्या बसमध्ये एसीच्या शॉर्ट सर्किट मुळे खाजगी बसने पेट घेतला.मात्र या अपघात प्रवाशी बचावले. बस चालकाने तातडीने प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठा अपघात टळला.
 
 



Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द